वाईजवळची पालपेश्वर लेणी

वाई. पश्चिम महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध गाव. कृष्णातीरावरचे एक टुमदार शहर. खूप पूर्वीपासून या गावाला महत्व आहे. आणि माझे बालपण येथे गेल्याने माझ्या दृष्टीने फारच. वाईला जसा कलेचा, इतिहासाचा ठेवा लाभला आहे तसाच निसर्गसौंदर्याचा ठेवा सुद्धा भरपूर आहे. परिसरात अनेक किल्ले, धरणे, आणि लेणी आहेत. त्यातीलच एक पालपेश्वर.

शहराच्या उत्तरेला ६ किमी अंतरावर लोहारे गावाजवळच्या डोंगरात या लेण्या खोदल्या आहेत. मूलतः ही लेणी बौद्ध-हीनयान पंथाच्या असून नंतरच्या काळात तेथील स्तूप हे शिवलिंग समजून पालपेश्वर हे नाव रूढ झाले.

कसे जाल : वाई मध्ये प्रवेश करण्यापूर्वी MIDC ला जाणाऱ्या रस्त्यावर , लोहारे नावाचे गाव , गावातल्या हापशी पासून एक पाणंद शेताकडे जाते , शेताच्या कडे कडेने जाऊन पलीकडच्या डोंगर रांगेत दक्षिण टोकाला निम्म्या अंतरावर झाडीमध्ये लेण्याच्या खाचा अस्पष्ट दिसतील, त्यांच्याकडे नाक करून टेकडी चढून जावे. लोहारे गावापासून सुमारे ३० मिनिटात लेणी गाठता येतात. येथे एकूण ५ वेगवेगळ्या गुहा आहेत.

लेणी क्र १ :  उजवीकडच्या भिंतीमध्ये कोरलेल्या ४ मूर्ती, नक्की कोणाच्या मूर्ती आहेत ते सांगता येत नाही, परंतु लक्ष्मी सरस्वती विष्णू गरुड यांच्या त्या असाव्यात, लक्ष्मीच्या हातामध्ये बांगड्या कोरलेल्या कळतात (संदर्भ : भटकंती अपरिचित साताऱ्याची… आदित्य फडके). मूर्तींच्या शेजारीच थोड्या उंचीवर  चौथरा, अन त्याच्या वर पोट माळा आहे.

लेणी क्र २ : या लेण्यामध्ये आत आणि बाहेर असे मिळून २ विहार आहेत, पावसाळ्यात दोन्ही विहारात पाणी भरते, आतील बाजूस सुबक घडणीचा नंदी आणि एक शिवपिंड आहे.

लेणी क्र ३ : हे सर्वात मोठे आणि प्रमुख लेणे आहे. यामध्ये डाव्या बाजूस खिडकी युक्त १ दालन, एका खिडकीजवळ पूर्णपणे भंगलेल्या ५ मूर्ती आहेत, त्यात गणपती आणि कुठल्याशा देवीची मूर्ती ओळखता येते, मुख्य दालनात गुडघाभर पाणी कायमच भरलेले असते, बाजूला बसायचे ओटे आहेत, समोरच्या विहारात प्रचंड आकाराचा स्तूप ( उंची सुमारे ५ फुट) या स्तूपाचे रुपांतर कालांतराने शिवलिंगामध्ये झाले असावे. याच स्तुपाला स्थानिक लोक पालपेश्वर किंवा दागोबा असं समजतात, त्याच्या समोर पाण्यात एक नंदी, आणि एक मूर्ती , स्तुपाला टेकून ठेवलेला एक अंडाकृती दगड हा स्तुपाचाच एक भाग असावा.

लेणी क्र ४ : अर्धवट खोदाई, उजवीकडे पाण्याचे टाके, डावीकडे एक विहार, आत मध्ये गाळ आणि माती भरल्याने अर्धवट बुजले आहे.

लेणी क्र ५ : पाण्याचे टाके, दगड माती भरल्याने बुजून गेलेलं आहे.

इतिहास : चैत्यगृहे त्यांची बांधणी आणि स्तूप यावरून ही लेणी बौद्ध हीनयान पंथी आहेत हे समजते, लेण्यांचा बांधणी-काळ इ .स. २ रे ते ३ रे शतक, देव देवतांच्या मूर्ती, नंदी हे नंतर च्या कालखंडात आले असावेत.

शहराच्या अगदी जवळ पण शहरीकरण पासून बरेच लांब असलेल्या या गुहा अथवा लेणी फारच प्रेक्षणीय आहेत.

सहभागी भटके – अजय काकडे, अमित कुलकर्णी, स्वानंद क्षीरसागर आणि महेश लोखंडे
संकल्पना, नोंदी – अजय काकडे
लेखन आणि छायाचित्रे – स्वच्छंदयात्री

palpeshwar-cave1

palpeshwar-murti

palpeshwar-shivling

palpeshwar_cave

22 Comments

 1. Nice photos!!! 🙂

  1. स्वच्छंदयात्री says:

   Thank you Santosh 🙂

 2. वा …छानच …

  1. स्वच्छंदयात्री says:

   धन्यवाद तू वेळोवेळी नोंदी ठेवल्याबद्दल.

 3. स्वछंदयात्री खूप मस्त वर्णन केले आहेस गावातल्या लोकांनी त्या दागोब्याला लिंग म्हणून जपून तरी ठेवले आहे ते महत्वाचे आहे…!!! 🙂 यातला ३ ऱ्या क्रमांकाच्या फोटोमधल्या मूर्ती या यक्षांच्या वाटतात त्यांच्या आकारावरून…!!!

  1. स्वच्छंदयात्री says:

   खरे आहे. स्थानिक लोकांसाठी हे जागृत देवस्थान आहे पण देवाच्या नावाखाली भविष्यात इतर गोष्टी टिकवून ठेवल्या पाहिजेत. त्यांच्या लेखी इतर मूर्ती म्हणजे फक्त फुटलेल्या भुसभुशीत मूर्ती. 🙁

 4. Sameer Karmarkar says:

  Sundar photos. Barechda wai la jaun sudhdha hey mahit nhavtey. Ata kenvha tari bahun yein. Thanks for the info.

  1. स्वच्छंदयात्री says:

   धन्यवाद समीर. नक्की बघण्यासारखे आहे. एकदा आवर्जून फक्त वाई परिसर भेट देणार असलात तर सांगा अशी अनेक ठिकाणे आहेत वाईजवळ.

 5. Vinit Date says:

  Amit thanks for sharing this info … mast photoz … aata Wai saidala gelo ki naaki baghun yenar ….

  1. स्वच्छंदयात्री says:

   धन्यवाद विनीत. पावसाळ्यात वाई परिसर बघण्याजोगा असतो. नक्की भेट द्या.

 6. Manasi says:

  mast ahe…

 7. पालपेश्वर लेण्यांबद्दल ऐकले होते. आज फोटोंंच्या व लेखाच्या माध्यमातून प्रत्यक्ष दर्शन झाले. छान.
  http://www.ferfatka.blogspot.in

 8. chetan karale says:

  Thanks Amit for palpeshwar caves information… wai parishratil etar thikanachi mahiti ashel tar please share kara …..

  1. स्वच्छंदयात्री says:

   धन्यवाद चेतन. वाई बद्दल बरीच माहिती आहे. फक्त एकत्र करून मांडायची आहे.

 9. Charudatta says:

  Amit, Very nice concept. I like it . Photography as usual awesome.

  1. स्वच्छंदयात्री says:

   Thanks Charudatta.

 10. Hemant Pokharankar says:

  अनुराग, कुतूहल म्हणून विचारतो. यक्षमूर्ती अशा प्रकारे जमिनीवर कोरलेल्या असतात कां? कारण मला तरी खांब तोलून धरलेल्याच माहिती आहेत. या मूर्तीं यक्षमूर्ती म्हणून कशा ओळखाव्या?

  अमित, अत्यंत सुंदर फोटोझ आणि माहितीदेखील. थोडक्यात महत्त्वाचे’ मस्त मांडले आहे.. आणि हो अभिनंदन. ब्लॉगला मिळालेल्या बक्षिसाबद्दल.. 🙂

  1. स्वच्छंदयात्री says:

   धन्यवाद हेमंत…

 11. Vishal says:

  Best

  1. स्वच्छंदयात्री says:

   Thanks Vishal

 12. Hemant Lenyanmadhey kahi thikani yaksh murti sapdtat tula ase udhaharn baghayache asel tar pataleshwar chya lenyanmadhey ashi kahi chitre aahet korleli…!!!

 13. […] मागची भटकंती होऊन दोन आठवडे उलटले तरी पुढचे बेत ठरत नव्हते. तशी आमची भटकंती ठरवायची पद्धत वेगळीच आहे म्हणा. या वेळी ठाणे जिल्यातील किल्ले बघायचे एकमताने (?) ठरले होते. तसे ध्रुव आणि वाघोबाने रात्री “जागवून” एक प्लान सुद्धा बनवला होता. पण प्लान प्रमाणे घडत असते तर आपला देश आत्ता कुठे पोचला असता नाही का? अगदी शुक्रवारी सकाळपर्यंत ठाणे जिल्हा एकदम फायनल होता. पण आम्हा पुणेकरांची गाडीची सोय न झाल्याने सोयीचे म्हणून पेण-पनवेल जवळचे किल्ले फुल अँड फायनल झाले. मिरगड-सांकशी-रत्नदुर्ग-माणिकगड असा भला मोठा बेत कागदोपत्री उतरला आणि शुक्रवारबरोबरच संपला. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *